Breaking News

जासई हायस्कूलमध्ये मास्कचे वाटप

उरण : प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमधील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात दिर्घ लॉकडाऊन नंतर सोमवारी (दि. 4) शाळा सुरू झाली. शाळा सुरू होण्यासाठी शिक्षण खात्याच्या धोरणानुसार शाळेची झालेली तयारी पाहणी करून गरजू विद्यार्थ्यांना स्वखर्चाने 500 मास्कचे वाटप शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष आणि भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील यांनी केले.

या साठी सुरेश पाटील हे स्वतः गाव कमिटीचे अध्यक्ष  यशवंत घरत, सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य गोपीनाथ ठाकूर, यांच्या समवेत उपस्थित राहून शाळेची वर्ग स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय सुविधा यांची पाहणी केली.शाळेच्या पहिल्या दिवशी सुरुवातीस हजर असलेल्या विद्यार्थी- पालक यांचे शाळेच्या वतीने स्वागत केले. त्यानंतर यापुढे दररोज शाळेत विद्यार्थ्यांना यावे लागणार असल्याने त्यांना मास्कची नितांत गरज लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी स्वखर्चाने आपल्या मार्फत विद्यार्थ्यांना 500 मास्कचे वाटप केले. ज्या काही विद्यार्थ्यांचे मास्क तुटके होते, खराब होते तर काहींनी मास्क परिधान केले नव्हते अशांना व इतर गरजू विद्यार्थ्यांना आपल्या हस्ते व शाळेचे उप प्राचार्य पी. पी. मोरे, पर्यवेक्षक आर. एस. साळुंखे यांच्या हस्ते वाटप केले.

या मास्क वाटप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख यांनी केले. जी. आर. म्हात्रे यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक व सुरेश पाटील यांचे आभार मानले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply