Breaking News

रास्त भाव धान्य दुकानातून कमी धान्य

आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागवली तहसीलदारांकडून माहिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
सरकार मान्य रास्त भाव धान्य दुकानातून दिले जाणारे धान्य कमी प्रमाणात ग्राहकांना मिळत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांनी या संदर्भातील गांभीर्य लक्षात घेऊन याबाबतची सविस्तर माहिती पनवेलचे तहसीलदार यांच्याकडून मागितली आहे.
नुकताच पनवेल विधानसभा मतदारसंघातील नेरे गावात आमदार प्रशांत ठाकूर यांनी गाव चलो अभियानातंर्गत भेट दिली होती. त्या वेळी एका वस्तीला भेट दिल्यानंतर तेथील नागरिकांनी त्यांना रेशन दुकानातून पाच किलो धान्याऐवजी तीन किलो तांदूळ व एक किलो गहू असे चार किलोच धान्य मिळत असल्याचे सांगितले होते. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी गावातील इतर लोकांसोबत चर्चा केल्यानंतर ही बाब खरी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
सरकारच्या माध्यमातून रास्त भावात धान्य दिले जात असताना रेशनिंग दुकानदारांकडून मात्र शिधापत्रिकाधारकांना कमी प्रमाणात धान्य दिले जात आहे. त्यामुळे याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना त्यांचे धान्य योग्य प्रमाणात मिळवून देण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने तहसील कार्यालय पुरवठा शाखेतून प्रत्यक्षात किती धान्य वाटप होते? याची माहिती तसेच पाच किलो धान्य देण्याऐवजी कमी धान्य नागरिकांना देण्यास कोण जबाबदार याचा तपास करून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आपण काय कारवाई केली, याची माहिती द्यावी, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply