Breaking News

फुंडे हायस्कूलचे संस्कार परीक्षेत सुयश

उरण : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचे, फुंडे येथील तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षात गांधी विचार संस्कार परीक्षेत उज्ज्वल सुयश मिळवले आहे. दरवर्षी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने महात्मा गांधीजींच्या जीवन कार्यावर आणि त्यांच्या विचारांवर आधारीत इयत्ता पाचवी ते नववी अखेर इयत्तावार प्रमाणपत्र परीक्षा घेतली जाते. चालू वर्षीच्या या परीक्षेत संपूर्ण रायगड जिल्ह्यातून इयत्ता पाचवीमध्ये आदित्य राजेंद्र घुटूकडे, इयत्ता सातवीमध्ये प्रियंका नामदेव मुंजे या फुंडे हायस्कूलच्या दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या  वतीने या दोन्ही गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या वतीनेही या दोघांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य एम. एच. पाटील, पर्यवेक्षिका आशा मांडवकर, जी. सी. गोडगे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा शाळा पातळीवर सत्कार करण्यात आला. या परीक्षेसाठी गांधी विचार परीक्षेचे प्रमुख एन. एल. गावंड, सहायक डी. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. सर्व शिक्षकांनी  आणि विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply