Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून 100 कोटी रुपयांच्या विकासकामांचे गुरुवारी भूमिपूजन

मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची लाभणार उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून 100 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी (दि. 29) सायंकाळी 6 वाजता मोहोपाडा येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते होणार आहे.
मोहोपाडा येथील अचानक मैदानावर होणार्‍या या कार्यक्रमात उरण विधानसभा मतदारसंघामध्ये करण्यात येणार्‍या विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून नागरिकांनीही या सोहळ्यास उपस्थित राहून विकासाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply