पेण : प्रतिनिधी
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत वर्धा येथील प्रशिक्षकांतर्फे वडखळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाशेजारील मंदिरात बचतगटाच्या कामकाजा विषयाचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात 70 महिला बचत गटांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
वडखळचे ग्रामविकास अधिकारी धोदरे यांनी शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी अरूणा रत्नपाल बहादुरे, शुभांगी चंद्रशेखर लोखंडे, लिलाबाई भाऊराव कोहले हे प्रशिक्षक उपस्थित होते. महिला बचतगटाचे कामकाज चालविणे, बचतगटाचे दस्ताऐवज ठेवणे, व्यवसायात उत्पादित होणार्या मालाची विक्री, बँक व्यवहार हाताळणे, कर्ज वाटप या बाबतचे मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आले. या शिबिरात क्षेत्रेश्वर ग्रामसंघ, विनायक ग्रामसंघ, सावित्रीबाई फुले ग्रामसंघ, साईकृपा ग्रामसंघ, माऊली ग्रामसंघ इत्यादी ग्रामसंघासह 70 महिला बचतगटांचे प्रतिनिधी या शिबिरात सहभागी झाले होते.