आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल तालुक्यातील रोडपाली बौद्धवाडी येथील सामाजिक कार्यकत्यांनी रविवारी (दि. 3) भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. या वेळी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पगुच्छ आणि पक्षाची शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामार्फत पनवेल तालुक्यात होत असलेली विकासकामे पाहून अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी होत आहे. याअंतर्गत युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अनुराग गायकवाड, रोडपाली अध्यक्ष रिकी पवार, उपाध्यक्ष भावेश गायकवाड, सिद्धांत गायकवाड, रितिक गायकवाड, राहुल गायकवाड, कारण गायकवाड, राजेश कांबळे, हर्ष गायकवाड, समीर गायकवाड, संदीप गायकवाड, सूर्यकांत जाधव, शौकत खान, आरिफ शेख, महादेव लाटे, बाळू वाघे, विजय शिंदे, जिया खान, साहिल खान, विनोद जयस्वाल, देवेंद्र शर्मा यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. या सर्व कार्यकर्त्यांचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पगुच्छ आणि पक्षाची शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले.
या वेळी कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, जिल्हाचिटणीस संदीप म्हात्रे, कळंबोली उपाध्यक्ष सुनील ढेंबरे, युवा मोर्चा चिटणीस निशांत गिल, अनुसूचित जाती अध्यक्ष विष्णू गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.