Breaking News

नवीन पनवेलमध्ये भाजपकडून ‘नारीशक्ती वंदन’

महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची लाभली उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
देशातील नारीशक्तीला सक्षम आणि त्यांचा सन्मान करण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केले असून भारतीय जनता पक्षाने फक्त विकास नाही, तर विश्वास देण्याचेही काम केले असल्याचे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नवीन पनवेल येथे केले.
मोदी सरकारच्या महिलांसाठीच्या विविध योजनांच्या पडलेल्या प्रभावाची जाणीव करून देण्यासाठी शक्तिवंदन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेल विधानसभा भाजप महिला मोर्चाच्या वतीने रविवारी (दि.3) नारीशक्ती वंदन समारंभ आयोजित करण्यात आला होता. नवीन पनवेल येथील के.आ.बांठिया हायस्कूलच्या मैदानात झालेल्या या समारंभाचे उद्घाटन महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या हस्ते झाले. दरम्यान, या समारंभाला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
अर्थचक्राला सकारात्मक गती देणार्‍या नऊ सीआरपी बचत गटांच्या संचालिकांचा या वेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये सुषमा भागित, शिल्पा म्हात्रे, (कोन), पुष्पा घरत (भाताण), रूपिका भोईर (डेरवली), शोभा मते (कानपोली), श्वेता ठाकूर (नेरे) आणि अभिलाषा ठाकूर (पनवेल) यांचा समावेश होता. दरम्यान या समारंभाचे औचित्य साधून महिलांसाठी हळदीकुंकू, लकी ड्रॉ, पैठणीचा खेळ यांसारखे कार्यक्रम घेण्यात आले. त्यास परिसरातील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.
या समारंभास भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, मयुरेश खिस्मतराव, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस मंजुषा कुद्रमोती, चिटणीस अर्चना देसाई, पनवेलच्या माजी महापौर डॉ.कविता चौतमोल, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, संध्या शारबिद्रे, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, उपाध्यक्ष संगीता पाटील, बिनिता घुमरे, स्नेहा गोगटे, चिटणीस अश्विनी अत्रे, शिल्पा म्हात्रे, पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, खारघर शहर अध्यक्ष साधना पवार, कामोठे शहर अध्यक्ष वनिता पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष मनिषा निकम, कर्जत शहर अध्यक्ष नम्रता कांदळगावकर, खोपोली शहर अध्यक्ष शोभा काटे, खालापूर शहर अध्यक्ष सुजाता दळवी, उरण अध्यक्ष अ‍ॅड. राणी म्हात्रे, माजी नगरसेविका दर्शना भोर्ईर, मोनिका महानवर, नीता माळी, संगीता कांडपाल, सुलोचना कल्याणकर, सुहासिनी शिवणेकर, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष विद्या तामखडे, समिना साठी, लीना पाटील, सपना पाटील, मनिषा मंजुळे, स्नेहल खरे, वर्षा नाईक, मनीषा बेहरा, हरजिंदर कौर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि परिसरातील महिल्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply