Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आपला दवाखाना, आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
सातत्याने आरोग्यसेवा पुरविणार्‍यावर माझा भर राहिला आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिकेच्या सर्वंकष विकासासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील इतर महापालिकांपेक्षा ही तरुण महापालिका आहे. कमी वेळेत केलेल्या विकासामुळे ती अग्रेसर बनत चालली असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि.7) केले.
पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना प्राथमिक उपचारांच्या उत्तम सुविधा मिळण्याच्या दृष्टीने तळोजातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नावडे येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि तोंडरे येथील नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिका सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवूनच सगळी कामांची धोरणे ठरवत आहेत, असे सांगितले.
या कार्यक्रमांना महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी, डॉ.अरुणकुमार भगत, पापा पटेल, भाजप नेते सुरेश खानावकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, गाव अध्यक्ष भूपेश खानावकर, विशाल खानावकर, मदन खानावकर, शुभम खानावकर, नीरज खानावकर, प्रकाश म्हात्रे, महेश पाटील, राम पाटील, अशोक पाटील, महिला मोर्चा प्रभाग अध्यक्ष काजल पाटील, अमृता पाटील, अशोक साळुंखे, श्रीनाथ पाटील, वसंत पाटील, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी, इतर अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनवेल महापालिकेने नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यावर नेहमीच भर दिला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गंत 15 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर असून सर्व ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. मंजूर नऊ आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांपैकी आठ उपकेंद्र कार्यन्वित आहेत, तर हिंदूहृसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना खारघर सेक्टर 12 व आज नावडे ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply