पनवेल : रामप्रहर वृत्त
सुकापूर ग्रामस्थ मंडळ आणि सुकापूर प्रीमियर लीगच्या वतीने सरपंच चषक 2024 ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.7) झाले. सुकापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात 10 मार्चपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे.
दरम्यान, आदर्श सरपंच म्हणून सुकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता पाटील यांना राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नवराष्ट्र सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी सरपंच योगिता पाटील यांचा सन्मान केला.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, माजी पं.स. सदस्य भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक समीर ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा म्हसकर, अनिता पाटील, प्राची जाधव, माजी उपसरपंच अलुराम केणी, हनुमंत खुटले, विनायक शेळके, आत्माराम पाटील, अनंता पाटील, संजय पाटील, कृष्णा म्हात्रे, चांगदेव ठाकूर, चांगदेव पवार, मोहन दळवी, जनार्दन पाटील, पोलीस पाटील रोशन जाधव, नितीन पोपेटा, प्रमोद पोपेटा, प्रशांत म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …