Breaking News

सायकलपटू अ‍ॅड. गजानन डुकरे यांचा आणखी एक विक्रम

90 किमीचे अंतर साडेतीन तासांत पूर्ण

कर्जत ः बातमीदार
क्रीडापटू असलेले कर्जत तालुक्यातील अ‍ॅड. गजानन डुकरे यांनी 26 जानेवारी रोजी भारताचा तिरंगा झेंडा लावून सायकल चालवत एक विक्रम केला होता. त्यानंतर रविवारी (दि. 21) झालेल्या सायकालिंगच्या राजगुरू भगतसिंग सुखदेव इंडियन फ्लॅग साईड वर्ल्ड अट्टेम्प स्पर्धेत त्यांनी 90 किलोमीटर अंतर विक्रमी वेळेत पार केले. त्यामुळे सायकालिंग स्पर्धेत लागोपाठ दुसर्‍यांदा अ‍ॅड. डुकरे यांनी आंतरराष्ट्रीय विक्रम केला आहे.
26 जानेवारी 2021 रोजी झालेल्या स्पर्धेत अ‍ॅड. गजानन डुकरे यांनी 72 किलोमीटरचे अंतर विक्रमी वेळेत म्हणजे दोन तास 47 मिनिटांत पूर्ण केले होते. डुकरे यांचा हा विक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद झाला होता. त्यानंतर रविवारी झालेल्या सायकलिंगच्या राजगुरू भगतसिंग सुखदेव इंडियन फ्लॅग राईड वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्टमध्ये अ‍ॅड. डुकरे यांनी भारतातून सहभाग नोंदवित 90 किमीचे अंतर तीन तास 28 मिनिटांत पूर्ण केले. या राईडचे वैशिष्ट्य म्हणजे 90 किमीचे हे अंतर आपला तिरंगा झेंडा सायकलवर फडकवत 10 तासांत पूर्ण करायची होती. अ‍ॅड. डुकरे यांनी ही स्पर्धा आयोजकांनी दिलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेत पूर्ण केली.
45 वर्षीय अ‍ॅड. डुकरे यांनी रविवारी सकाळी 6 वाजता नेरळ येथील हुतात्मा चौकातून सायकलिंगला सुरुवात केली. हुतात्म्यांना अभिवादन करून आपल्या मित्र परिवारासह स्पर्धेला सुरुवात करणार्‍या डुकरे यांनी नेरळ ते कर्जत अशा तीन फेर्‍या आणि शेवटची फेरी कर्जत ते वांगणी अशी मारत 90 किमीचे अंतर पार केले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply