Breaking News

न्हावे येथील सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पार्थ इंटरप्रायझेसच्या वतीने सरपंच चषक 2024 क्रिकेट स्पर्धा न्हावे येथे आयोजित करण्यात आली आहे. गावदेवी मैदानात खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 10) झाले.
उद्घाटन समारंभास न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, उपसरपंच राजेश म्हात्रे, वहाळ ग्रामपंचायतीचे उपरपंच अमर म्हात्रे, माजी सरपंच चंद्रकांत भोईर, हरिश्चंद्र म्हात्रे, माजी उपसरपंच किसन पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, न्हावे ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर, नरेश मोकल, तुषार भोईर, किशोर घरत, जय घरत, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत जनार्दन पाटील, संदीप सखाराम पाटील, संदीप पाटील, संदीप भोईर, रूपेश घरत, विनोद पाटील, दीपक भोईर, अनिल भोईर, महिला मंडळ अध्यक्ष मीनाक्षी पाटील, महिला मंडळ सदस्य सुनिता भोईर, रंजना घरत, ललिता ठाकूर, जागृती ठाकूर, धनवंती म्हात्रे, सुशीला पाटील, शोभा भोईर, कमलाबाई म्हात्रे आदी उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आयोजकांचे कौतुक करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply