Breaking News

विकास कामांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात शहराचा चेहरामोहरा बदलणार – आमदार रवीशेठ पाटील

नगरपालिका हद्दीत विविध विकास कामांचे लोकार्पण

पेण: प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पेण शहराच्या विकासाकरिता कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केला असून येणाऱ्या काळातही अधिकचा निधी आणून शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे सांगून भाजप हा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले.
पेण नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या शुभहस्ते व माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण उर्वरित विकास करणे, स्टेडियम लगत असलेल्या जागेत सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे याकामांचे भूमिपूजन व कासारतळे सुशोभीकरण, विश्वेशवर स्मशानभूमी नव्याने बांधणे, भोगावती नदीचे सुशोभीकरण व विसर्जन घाटाचे विकास करणे या कामांचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमास माजी आमदार धेर्यशील पाटील, माजी जि. प. अध्यक्षा अँड. नीलिमाताई पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील, मा. उपनगराध्यक्षा वैशाली कडू, मा. गटनेते अनिरुद्ध पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, मा. जि.प. सदस्य डी. बी. पाटील, मा. नगराध्यक्ष रघुनाथ बोरेकर, मा. नगरसेवक अजय क्षिरसागर, मा. जि. प. सदस्य प्रभाकर म्हात्रे, नगररचना अभियंता सुहास कांबळे, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, हितेश पाटील, अण्णा कडू, रामभाऊ गोरीवले नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.  पुढे बोलताना आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले कि गेल्या १० वर्षात पेणमध्ये जी विकासकामे यापुढेही होणार असून विश्वेशवर भूमी, भोगावती नदीवर नागरिकांना पर्यटनाच्या दृष्टीने या भागाचा विकास करण्यात लसूण जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा विरोधकांनी कोल्हेकुई करीत राहावे व आम्ही विकास करतच रहाणार असे शेवटी आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले.  यावेळी माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी सांगितले कि, पेण शहरात कामांचे भूमिपूजनाचे नारळ फोडून थांबलो नाहीतर केले त्या त्या कामाचा पाठपुरावा करून उदघाट्न करण्याचे कामही आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून केले आहे असे सांगून आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातूनच पेण नगरपरिषदेला जवळ जवळ ११० कोटींचा निधी मिळाला आहे असे यावेळी प्रितम पाटील यांनी सांगितले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply