महाराष्ट्रातील 20 उमेदवारांसह देशभरातील 72 उमेदवारांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी बुधवारी (दि. 13) जाहीर झाली. या यादीत हिमचाल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, त्रिपुरा या राज्यातील उमेदवारांची नावे यामध्ये आहेत. महाराष्ट्रातील 20 उमेदवारांसह देशभरातील 72 उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत.
अपेक्षेप्रमाणे नागपूरमधून नितीन गडकरी, जालन्यातून रावसाहेब दानवे, भिवंडीमधून कपील पाटील तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे यांना बीडमधून तिकीट देण्यात आले आहे. प्रीतम मुंडे यांच्याजागी पंकडा मुंडे, उन्मेष पाटील यांच्या जागी स्मिता वाघ, गोपाळ शेट्टी यांच्याजागी पियूष गोयल तर संजय धोत्रे यांच्याजागी त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या दुसर्या यादीमध्ये रावेरमध्ये रक्षा खडसे, वर्धामध्ये अनुप धोत्रे, नागपूरमध्ये नितीन गडकररी, चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार, नांदेडमध्ये प्रताप चिखलीकर, जालनामध्ये रावसाहेब दानवे, दिंडोरीमध्ये भारती पवार, भिवंडीमध्ये कपील पाटील, मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल, मुंबई उत्तर पूर्वमध्ये मिहिर कोटेचा, पुणेमध्ये मुरलीधर मोहोळ, अहमदनगर दक्षिणमध्ये सुजय विखे, लातूरमध्ये सुधाकर श्रृंगारे, माढामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर, सांगलीमध्ये संजयकाका पाटील, नंदूरबारमध्ये हिना गावित, धुळेमध्ये सुभाष भामरे, जळगावमध्ये स्मिता वाघ, बीडमध्ये पंकजा मुंडे, चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.