पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख व पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे नेवाळी गावातील विद्युत समस्या मार्गी लागली असून या डीपीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते गुरुवारी (दि.14) करण्यात आले.
पनवेल मतदारसंघातील नेवाळी गावात स्वतंत्र विद्युत डीपी नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या संदर्भात त्यांनी महावितरणकडे स्वतंत्र डीपी उपलब्ध करून देण्याची मागणी केली, मात्र महावितरणकडे निधी नसल्याने याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांना माहिती दिली असता त्यांनी त्वरित जिल्हा वार्षिक नियोजन निधीमधून डीपीसाठी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानुसार या डीपी बसवण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी झाला.
या कार्यक्रमास भाजपचे तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य आकाश काथारा, राजेश काथारा, सुगंधा राजेश काथारा, माजी सदस्य कल्पना केशव काथारा, मोतीराम काथारा, अनिकेत काथारा, केशव काथारा, वैभव काथारा, ताराबाई काथारा, रोशन काथारा, जयेंद्र काथारा, विश्वास काथारा, सचिन काथारा, स्नेहल काथारा, विजय काथारा, श्रीचन भंडारी, अनंताबुवा पाटील, राजेश काकडे, प्रकाश खांडेकर, प्रमोद खांडेकर, विठ्ठल काथारा, आकाश पाटील, बळीराम काथारा, कुंडलिक पाटील, रूपेश काथारा, राहुल काथारा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, या कामाची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी महावितरणच्या अधिकार्यांकडून घेतली असता त्यांनी 30 दिवसांत या डीपीचे काम पूर्ण करणार, असे आश्वासन दिले; तर डिपीच्या कामासाठी त्वरित निधी उपलब्ध करून ग्रामस्थांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे या वेळी आभार मानले.
Check Also
गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …