Breaking News

रिटघर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख व पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे मतदारसंघात अनेक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत. या अंतर्गत रिटघर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत गावातील रस्ता तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते गुरुवारी (दि.14) करण्यात आले. 30 लाख रुपयांचा निधी वापरून राज्य महामार्ग 102 ते रिटघर खानाव रस्ता तयार करण्यात येणार आहे.
या भूमिपूजन समारंभास भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी पं.स. सदस्य भूपेंद्र पाटील, दुंदरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रमेश पाटील, गणूबुवा भोपी, कृष्णबुवा पाटील, भगवान भोपी, विष्णू भगत, विलास गोपी, राजेश भोपी, बाळकृष्ण भोपी, सुनील शेळके, दयेश जांभळे, अमर शेळके, राजन भगत, ग्रामपंचायत सदस्य शांताराम चौधरी, संतोष चौधरी, विलास सिनारे, भालचंद्र भोपी, गणेश गोपी, विलास भोपी, धनाजी भोपी, जयदत्त भोपी, दीपक भगत, उमेश भोपी, बुथ अध्यक्ष गुरूनाथ भोपी, विकास भगत, हेंदरबुवा भोपी, किसन भोपी, कृष्णा शिनारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, या वेळी ग्रामस्थांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply