Breaking News

उरणमधील रिक्षाचालकाची रुग्णांना मोफत सेवा

उरण : रामप्रहर वृत्त

कोरोना विळख्यात देशाबरोबर राज्य ही सापडला आहे. यामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने कोणतीच साधन किंवा वाहतुकीचा पर्याय नाही. अशावेळी सर्वसामान्यांची ससेहोलपट होत आहे. विशेषता आजारी व्यक्तींचे ही अडचण लक्षात घेत उरणमधील सर्वसाधारण रिक्षाचालक अय्याज फकी यांनी दूर करीत मोफत सेवा देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अनेकांचा दवाखान्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उरणमधील अय्याज फकी या 55 वर्षीय रिक्षाचालकांने कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने येण्याजाण्यासाठी कोणतेच वाहतुकीचे साधन नाही. यामुळे एखाद्या आजारी व्यक्तीला दवाखान्यात येण्यापासून वंचीत रहावे लागत होते. याची दखल अय्याज फकी यांनी घेत आपली रिक्षा सर्वांसाठी मोफत ठेवत जनसेवा करण्याचे व्रत हाती घेतले आहे.

आजपर्यंत त्यांनी 150 च्या वरती लोकांना मोफत सेवा दिली आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे घरातील फकी यांना बाहेर जाण्यास मनाई करीत होते. परंतु त्यांच्या कार्याचे महत्व पटल्यानंतर त्यांनीही त्यांच्या या कार्याला समर्थन दिले आहे. ही सेवा फक्त उरणमध्येच नाहीतर जासई, करळ, सोनारी, नवघर, बोकडविरा, कोप्रोली, नागाव, केगावं, दांडा, मोरा, करंजा, चाणजे, पाणजे आदी ठिकाणी त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता मोफत सेवा दिली आहे.

याबाबत फकी यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी चर्चा केली असता कोरोनाचा सामना करताना डॉक्टर, पोलीस, पत्रकार, अधिकारी वर्ग व सफाई कामगार हे जीवावर उदार होऊन सेवा देत आहेत. मग आपण ही समाजाचे देणे लागतो, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपणही काहीतरी हातभार लावावा. या उद्देशानेच मोफत रिक्षा सेवा देण्यास सुरुवात केली आहे. माझ्या गाडीवर सर्व पत्ता व मोबाइल नंबर दिला आहे. तसेच डॉक्टर, पॅथॉलॉजी यांच्याकडे नंबर आहे. कोणाला गरज लागल्यास त्यांनी अय्याज फकी 9769825268 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. याचा बोध घेऊन अय्याज फकी यांचे अनुकरण इतरांनी करण्यास हरकत नाही.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply