Breaking News

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजप कर्जतच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप

मुख्याध्यापकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शाळेच्यावतीने मानले आभार

रामप्रहर वृत्त:

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वखाली सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. त्यानुसार श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील बोरगाव प्राथमिक शाळा बोरगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

   यावेळी स्थानिक बुध अध्यक्ष यशवंत डोंगरे, वैभव भगत, एमरोली पंचायत समिती विभाग अध्यक्ष रामदास तुपे, शरद भाऊ श्रीखंडे, कर्जत तालुका सरचिटणीस संदीप म्हसकर, चिंचवली बीएलए राजेश नाईक तसेच बोरगाव गावातील ललित धस, महेश डोंगरे, रवी पाटील, रोशन पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ठाकूर सर यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शाळेतर्फे आभार मानले

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply