Breaking News

प्रजासत्ताक दिना निमित्त कर्जतमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम

कर्जत : प्रतिनिधी 

प्रजासत्ताक दिना निमित्त कर्जत तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उपस्थित नागरिकांनी मनोरंजनाचा लाभ घेतला व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तालुक्यातील प्राथमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण उत्साहात करण्यात आले. यंदा बहुतांश ठिकाणी ध्वजारोहणा पुर्वी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

पंचायत समितीमध्ये सभापती सुजाता  मनवे यांनी ध्वजारोहण केले. या वेळी माजी सभापती प्रदीप ठाकरे, गट विकास अधिकारी बालाजी धुरी, विस्तार अधिकारी सुनील आहिरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. नगर परिषद कार्यालायातील ध्वजारोहण नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुरेश लाड, मुख्याधिकारी रामदास कोकरे आदींसह नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार विक्रम देशमुख, कर्जत पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अरुण भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत न्यायालयात न्यायाधीश मनोद तोकले, माथेरान नगरपालिकेच्या आवारात नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष झुलकरनैन डाभिया, कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे, राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मोहन काळे, कर्जत कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्र. प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, दहिवली येथील प्राथमिक शाळा आणि जनता विद्या मंदिर माजी आमदार सुरेश लाड, स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रेय डोंबे विद्यानिकेतनमध्ये शालेय समिती सदस्य डॉ. नितीन आरेकर, वरई ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सुरेश फराट, शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघात अध्यक्ष परशुराम घारे यांनी ध्वजारोहण केले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विलास देशमुख, सहकारी भात गिरणीत सीताराम मंडावळे यांनी ध्वजारोहण केले.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

कर्जत तालुक्यातील पळसदरी येथील प्राथमिक शाळेत शालेय समितीने दहावी परीक्षेत जास्त गुण मिळविणार्‍या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या हस्ते 15 ऑगष्ट रोजी आणि बारावी परीक्षेत जास्त गुण मिळविणार्‍या विद्यार्थी किंवा विद्यर्थिनीच्या हस्ते 26 जानेवारी रोजी ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार यंदाचे प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण करण्याचा पहिला मान 12 वी परीक्षेत जास्त गुण मिळविणार्‍या सृष्टी अजित निगुडकर हिने मिळविला. तिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply