Breaking News

भाजप स्थापना दिनानिमित्त पनवेलमध्ये बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त
प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि शेवटी स्वतः अशी देशहिताची विचारसरणी व त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा 45वा स्थापना दिन शनिवारी (दि.6) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये युवा मोर्चाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालय येथून सायंकाळी सुरू झालेल्या या बाईक रॅलीत पक्षाचे पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारूशीला घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, महिला मोर्चा शहराध्यक्ष राजश्री वावेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, उपाध्यक्ष चिन्मय समेळ, विधानसभा संयोजक रोहित जगताप, शहराध्यक्ष सुमित झुंझारराव, भाजप शहर उपाध्यक्ष केदार भगत, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष यमुना प्रकाशन, जैन समाजाचे संजय जैन, शिवाजी भगत, हरिश्चंद्र भगत, अभिषेक भोपी, मयूर आंग्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या सहभागी झाले होते.
या वेळी रॅलीमध्ये सहभागी युवकांनी देशासह जगात सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपचा जयघोष केला. रॅली पनवेल, नवीन, खांदा कॉलनी अशी फिरून पुन्हा पनवेलमधील मध्यवर्ती पक्ष कार्यालय येथे तिची सांगता झाली.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply