Breaking News

संकष्टी चतुर्थीनिमित्त भक्तांची मांदियाळी

उरण : वार्ताहर

संकष्टी चतुर्थी बुधवारी (दि. 22) असल्याने उरण शहरातील गणपती चौक येथील श्री गणपती देवस्थान येथे सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गणपतीची मूर्ती पुरातन काळातील असल्याने व सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वीची मूर्ती असल्याने या मूर्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिरातील आतील गाभारा अतिशय सुंदर असून लाकडावरील कोरीवकाम भक्तांचे लक्ष वेधून घेते. दर्शनी भाग सुंदर असल्याने एक सुंदर मंदिर भक्तांना मोहून टाकते. दर्शनासाठी उरण, मोरा, करंजा, केगाव, नागाव आदी ठिकाणाहून भक्तगण दर्शनासाठी येत असतात. दिवसेंदिवस भक्तांची गर्दी वाढत आहे. आलेल्या भक्तांना प्रसाद म्हणून श्रीफळ व पुष्पहार दिला जातो.

उरण शहरातील, तसेच ग्रामीण भागातील नागरिक गणपतीचे दर्शन घेऊनच बाजारात जातात. मंदिराची देखभाल वर्षानुवर्षे पौडवाल कुटुंबीय करीत आहेत. सकाळी 7 वाजता विधिवत पूजा करण्यात  आली. गणपतीचे महत्त्व एवढे आहे की मंदिरात प्रत्येक संकष्टी, अंगारकी व प्रत्येक मंगळवार भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते. दर मंगळवारी सकाळी 7.30 वाजता व सायंकाळी 7.30 वाजता महाआरती केली जाते. आरतीला भक्तगण मोठ्या संखेने उपस्थित असतात. अंगारकी व संकष्टी दिवशी अवर्तने, भजन केले जाते व चंद्रोदय झाल्यानंतर महाआरती घेतली जाते. प्रत्येक संकष्टी, अंगारकी दिवशी भक्तांना पूजेसाठी लागणारे नारळ, दुर्वा, फुलांचे हार मिळावेत यासाठी मंदिराच्या समोरील बाजूस हार-फुलांची दुकाने थाटण्यात येतात.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply