Breaking News

शिवजयंतीचा उदंड उत्साह

पनवेलमध्ये भव्य मिरवणूक; मान्यवरांचा सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बुधवारी (दि. 19) पनवेल महापालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने पारंपरिक ढोल-ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या वेळी शिवरायांच्या जयघोषाने पनवेल नगरी दुमदुमून गेली.
शहरातील शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्यास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. या मिरवणुकीत प्रमुख मान्यवरांसह जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, विक्रांत पाटील, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेवक अनिल भगत, प्रकाश बिनेदार, राजू सोनी, तेजस कांडपिळे, मुकीद काझी, नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, वृषाली वाघमारे, रूचिता लोंढे, शहर सरचिटणीस अमरिश मोकल यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, शालेय विद्यार्थी, शिवप्रेमी सहभागी झाले होते. या वेळी ढोल-ताशा आणि लेझीम पथकांनी आपली कला सादर केली. छत्रपती शिवाजी चौकातून निघालेली या मिरवणुकीचा समारोप टपाल नाका येथील शिवरायांच्या पुतळ्याजवळ समारोप झाला.
मिरवणुकीनंतर लेझीम पथकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यात प्रथम क्रमांक कोएसोचे के. व्ही. कन्या विद्यालय-पनवेल, व्दितीय आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय-नवीन पनवेल आणि तृतीय क्रमांक कोएसोचे व्ही. के. हायस्कूल-पनवेल यांनी पटकाविला. त्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे शिवजयंतीनिमित्त भाजप प्रभाग क्र. 19च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी वेशभूषा स्पर्धेत विजेत्यांना गावदेवी मंदिर येथे बक्षीस देऊन गौरविण्यात आले, तसेच सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह देण्यात आले.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply