Breaking News

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत कौशल्य गुण विकसित करावे -लोकनेते रामशेठ ठाकूर

महात्मा फुले महाविद्यालयात पदवीदान समारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
आजच्या स्पर्धेच्या काळात केवळ शिक्षण असून चालत नाही तर विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत कौशल्यगुण विकसित करणे आवश्यक असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी येथील महात्मा फुले महाविद्यालयातील पदवीदान समारंभात केले. माणूस पैशाने मोठा ठरत नसून मनाने मोठा असावा लागतो. स्वच्छ विचार आणि अपार मेहनत करण्याची तयारी आपल्याला मानसन्मान मिळवून देते, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.
रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात बुधवारी पदवीदान समारंभचे आयोजन करण्यात आले होते. हा समारंभास महाविद्यालयाच्या स्थनिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सांगली येथील रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव डॉ. के. एच. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थतीत झाला.
या वेळी प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे यांनी, काळ बदलत आहे, स्पर्धा वाढते आहे. आपण काळाची पाऊले ओळखून योग्य दिशेने पाऊल टाकणे आवश्यक आहे, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन त्यांना आयुष्याच्या पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या.
या पदवीदान समारंभावेळी प्राचार्य डॉ. के. एच शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणातून मिळणार्‍या जीवन मूल्यांचा यथायोग्य वापर प्रत्यक्ष जीवनामध्ये करणे गरजेचे आहे. आजची तरुण पिढी उद्याचे भवितव्य ठरवणारी आहे. 2047 पर्यत्त आपल्या देशाला जगातील नंबर एक ची महासत्ता बनवण्यासाठी तरुणांनी प्रयत्नांची पराकाष्टा करायला हवी आहे. काळ बदलत आहे, स्पर्धा वाढते आहे. आपण काळाची पाऊले ओळखून योग्य दिशेने पाऊल टाकणे आवश्यक आहे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, उपप्रचार्य प्राध्यापक डॉ. एन बी. पवार, वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख प्राध्यापक जे. बी. वारघडे, उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. राजाराम पाटील, प्राध्यापक प्रविण गायकर, डॉ. प्रफुल्ल वशेणीकर यांच्यासह विद्यार्थी, पालक तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply