Breaking News

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी करंजाडेमध्ये सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्ष महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 27) सायंकाळी 6.30 वाजता करंजाडे सेक्टर 4मधील टाटा पॉवरजवळील मैदानावर भव्य प्रचार सभा होणार आहे.
या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, विधानसभा प्रमुख नितीन पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, चिटणीस शिवदास कांबळे, जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, रासपचे अण्णा वावरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश ठोंबरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply