Breaking News

पनवेलच्या ग्रामीण भागातही खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली विकासकामे जमेची बाजू -खासदार श्रीरंग बारणे

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्षांच्या महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. या अनुषंगाने गुरुवारी (दि. 25) पनवेल ग्रामीण भागात झालेल्या झालेल्या प्रचार दौर्‍याला व चौकसभांना मतदार, नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आणि विकासकामे मावळ लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून केल्याचे नमूद करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात केलेली विकासकामे आपल्या जमेची बाजू असल्याचे अधोरेखित केले. शेडुंग येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रचार दौर्‍याला सुरुवात झाली. पुढे बेलवली, लोणीवली, वांगणी, आंबिवली, नेरे असा प्रचार दौरा झाला. नंतर वाजे येथे चौकसभा झाली. पुढे शिवणसई, दूंदरे, रिटघर, खानाव, मोर्बे, महालुंगी, चिंध्रण, पाले खुर्द, वावंजे येथे प्रचार दौरा, त्यानंतर खैरणे येथे चौकसभा होऊन पुढे नितळस, तोंडरे, पेंधर येथे प्रचार दौरा आणि मग नावडे व फेज 2ची चौकसभा झाली. या प्रचार दौर्‍यात भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, संतोष भोईर, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, सुनील फडके, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश ठोंबरे, मनसेचे तालुकाप्रमुख रामदास पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दर्शन ठाकूर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, एकनाथ देशेकर, माजी पंचायत समिती सदस्य राज पाटील, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, जिल्हा सरचिटणीस संध्या शारबिद्रे, माजी नगरसेवक संतोष भोईर, सुरेश खानावकर, सचिन म्हात्रे-पाटील, माजी सरपंच रमेश पाटील, राम पाटील, कृष्णा पाटील, अशोक गायकर, शैलेश माळी, आनंद ढवळे, योगेश लहाने, अनेश ढवळे, सुभाष पाटील, आप्पा भागित, डॉ. संतोष आगलावे, रामदास खेत्री, सतीश मालुसरे, सुनील पाटील, राजेश भोईर, राजेश भालेकर, शिल्पा म्हात्रे, अशोक साळुंखे, महेश पाटील, मयूर कदम, प्रकाश खैरे, दिनेश खानावकर, मदन खानावकर, नंदकुमार म्हात्रे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दौर्‍याचे जागोजागी स्वागत करण्यात आले. या वेळी भारत माता की जय, वंदे मातरम्, अबकी बार चारसौ पार, फिर एक बार मोदी सरकार, आप्पा बारणे आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा गगनभेदी घोषणा देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आसमंत दणाणून सोडला होता. हा उत्साह मतदान होईपर्यंत कायम ठेवण्याच्या सूचना देतानाच सर्वांत जास्त लीड देण्याचा निर्धार आपण सर्वांनी केल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले आणि तशा प्रकारे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जागरूक राहण्याचे आवाहन केले.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, देशाचा सर्वांत मोठा लोकशाहीचा उत्सव लोकसभा निवडणूक आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून लोकहिताचे अनेक निर्णय आणि योजना राबविल्या जातात. लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्यक्ष कामातून कृती करीत आहेत. पाचशे वर्षांपासून सुरू राहिलेल्या राम मंदिराची लढाई जिंकण्याचे आणि न्याय देण्याचे काम मोदीजींनी केले आहे. देशाची संस्कृती, परंपरा वृद्धिंगत करण्याबरोबरच सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचे काम करीत देशाचे नाव जगात उज्वल करण्याचे आणि देशाला जागतिक पातळीवर मोठी उंची देण्याचे काम मोदीजींनी केले आहे. पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात काम करण्यासाठी, लोकसभा मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि विकासाची गंगा यापुढेही सुरू ठेवण्यासाठी आपले बहुमूल्य मत मला द्या. पाठीमागील अडीच वर्षे सत्तेत असतानाही विरोधकासारखे होतो असा टोला खासदार बारणे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेता लगावला तसेच केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची ताकद जनकल्याणासाठी खंबीरपणे उभी आहे, असे सांगितले. मतदारांनी गेली दोन टर्म माझ्यावर विश्वास टाकून मला विजयी केले आणि या वेळीही प्रचंड मतांनी विजयी कराल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड काळापासून देशातील नागरिकांना मोफत अन्नधान्य दिले आणि यापुढील पाच वर्षेही दिले जाणार आहे. प्रत्येक शेतकर्‍याला दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदीजींच्या पावलावर पाऊल टाकत आणखी सहा हजार रुपयांची जोड दिली आहे त्यामुळे आता दरवर्षी शेतकर्‍यांना 12 हजार रुपये मिळत आहेत. मोदीजींनी गॅस सिलिंडर, शौचालय, जलजीवन मिशन, घरकुल, गर्भवती महिलांना मातृ वंदन योजना अशा अनेक योजना अमलात आणल्या आणि देशाचा विकास साधला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर आपल्या देशाचा सन्मान संपूर्ण विश्वात करण्याचे काम त्यांनी करीत देशाला बहुमान मिळवून दिला आहे. मावळमध्ये खासदार श्रीरंग बारणे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील.

विक्रमी मताधिक्याने खासदार श्रीरंग बारणे विजयी होणार -आमदार प्रशांत ठाकूर
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांचा विचार करून त्यांच्या प्रगतीसाठी लोकाभिमुख कार्य केले आहे. त्याच अनुषंगाने खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळचे प्रतिनिधित्व करीत लोकसभा मतदारसंघाचा विकास केला आहे. त्यामुळे ते विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केला. खासदार बारणे यांच्या पाठीशी केंद्र आणि राज्याची ताकद आहे. त्यामुळे यापुढेही विकासाची कामे होण्यासाठी त्यांना मतांची मोठी आघाडी मिळाली पाहिजे याकरिता प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या बूथवर मतांची आघाडी मिळवून द्यावी, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

आप्पा बारणे सर्वांत जास्त मतांनी विजयी होतील- भाजप नेते बाळासाहेब पाटील
पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत आणि अबकी बार चारसो पार होणार आहोत. मोदीजींनी जगभरात आपल्या देशाची मान उंचावली. त्यामुळे जगात सामर्थ्यवान नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, तर हाकेला ओ देणारे खासदार श्रीरंग बारणे आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात सहाही आमदार महायुतीचे आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. त्यामुळे आप्पा बारणे यांना पनवेल मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एक लाख मतांची आघाडी मिळणार असून आप्पा बारणे महाराष्ट्रातील सर्वांत जास्त मतांनी विजयी होतील, असा विश्वास भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

मागील निवडणुकीत पनवेल विधानसभा क्षेत्रातून खासदार श्रीरंग बारणे यांना 56 हजारांचा लीड दिला होता. या वेळी कमीत कमी एक लाख मतांची आघाडी मिळवून देण्याचा निर्धार केला आहे आणि ते सर्वांच्या मेहनतीने आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या विकासकामांमुळे शक्य होणार आहे.
-अरुणशेठ भगत, तालुकाध्यक्ष, भाजप

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply