Breaking News

होप मिरर फाऊंडेशनला पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

होप मिरर फाऊंडेशन संस्थेला शनिवारी (दि. 30) पनाच इमेज पुरस्कार 2021 देण्यात आला. या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन पनाच इमेज अ‍ॅवॉर्डचे संस्थापक आणि दिग्दर्शक विशाल कपूर यांनी केले होते. हा पुरस्कार भरूखा कन्स्ट्रक्शनचे सीईओ आणि मालक राजेश भरुका आणि बॉलीवूड उद्योगातील ज्येष्ठ संगीतकार इस्माईल दरबार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या वेळी फाऊंडेशचे संस्थापक रमझान शेख म्हणाले की, अनिश्चित काळामध्ये हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल कार्यसंघातील सर्व सदस्यांचे आभार. आमच्या कार्याची दखल असे व्यासपीठ घेत आहे. आमचा कार्यसंघ आणि देणगीदारांमुळेच हे शक्य झाले आहे. विशाल कपूर आणि जफर पीराजादा यांनी आमच्या कार्याची दखल घेतली. त्यामुळेच फाऊंडेशनला पुरस्कार  मिळाला.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply