Breaking News

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंसाठी पंजाब, हरियाणाच्या बांधवांची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त
पुढील पाच वर्षे ही देशासाठी निर्णायक असणार आहेत. त्यामुळे देशासाठी वेळ काढून आपले भविष्य सुरक्षीत ठेवण्यासाठी तसेच नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी येत्या 13 तारखेला धनुष्यबाना समोरील बटन दाबून मतदान करा, असे आवाहन भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी पंजाब आणि हरियाणा मधील बांधवांच्या बैठकीवेळी केले.
मावळ लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांचा पनवेल विधानसभा मतदार संघात जोरदार प्रचार सुरू आहे. त्यानुसार श्रीरंग बारणे यांचा पनवेल भेट दौरा आयोजित करून श्रीरंग बारणे यांनी समाजबांधवासोबत रविवारी संपर्क साधला. या पार्श्वभुमीवर कळंबोली येथील देवांशी हॉटेलमध्ये पंजाब आणि हरियाणा बांधवाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी फिरसे एकबार तीर कमान फिरसे एकबार मोदी सरकार हा नारा देत समाज बांधवांनी श्रीरंग बारणे यांना समर्थन देत त्यांना विजयी करण्याचा विश्वास दिला.
या वेळी श्रीरंग बारणे यांनी सांगीतले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षा केलेल्या कामांच्या जोरावर जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचवण्याचे काम केले. त्यांच्यामुळे देशासह महाराष्ट्रात सर्व जाती आणि धर्मांचे बांधव शांततेत राहत आहेत. त्यामुळे देशाला सुरक्षीत ठेवण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना विजयी करण्यासाठी येत्या 13 तारखेला मतदान करा, असे आवाहन करून तुमच्या आशीर्वाद आणि सहयोगातून मी तीसर्‍यांदा पुन्हा संदेत जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून श्रीरंग बारणे हे तीन लाखांहून अधिक मतांनी निवडणुक येथील असा विश्वास व्यक्त केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करतात याची गॅरंटी आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी धनुष्यबानासमोरील बटन दाबून श्रीरंग बारणे यांना विजयी करा, असे आवाहन केले.
या बैठकीला महायुतीचे अधिकृत उमेदावर श्रीरंग बारणे, भाजपचे मावळ लोकसभा निवडणुक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख परेश ठाकूर, जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, गुरुद्वारा सुप्रीम कौन्सिल ऑफ नवी मुंबईचे प्रेसीडेंट जसपास सिंग सिंद्धू, सुखविंदर सिंग, माजी नगरसेवक राजेश शर्मा, सित्तु शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, युवा नेते हॅप्पी सिंग यांच्यासह समाज बांधव मोठ्या सख्येने उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply