कर्जत : बातमीदार
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 23) पहाटेच्या सुमारास कर्जत चारफाटा येथे कत्तलीसाठी गुरे घेवून चाललेला टेम्पो पकडला. दोन जनावरे असलेला हा टेम्पो कर्जत पोलीस ठाण्यात नेण्यात आला आहे.
खोपोली-पळसदरी रस्त्याने कत्तलीसाठी नेली जाणारे जनावरे मोठ्या प्रमाणात येत असतात. ती पुढे कर्जत-नेरळ रस्त्याने जात असतात. अशा गाड्या गोरक्षक सातत्याने पकडत असतात. गुरे असलेला टेम्पो (एमएच-46,बीजी-3684) गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कर्जत चारफाटा येथे आला. त्यावेळी तेथे असलेले बजरंग दलाचे कार्यकर्ते मयुरेश चौधरी यांनी टेम्पो थांबवून ठेवला आणि तातडीने आपल्या सहकार्यांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर तात्काळ विश्व हिंदू परिषदेचे धर्म प्रसारक प्रमुख महेश बडेकर, अमोल ओसवाल,आणि काही कार्यकर्ते तेथे पोहचले. त्या सर्वांनी जनावरे भरलेला टेम्पो भल्या सकाळी कर्जत पोलीस ठाण्यात नेला. त्या ठिकाणी गोरक्षकांना मदत करण्यासाठी अॅड. हृषीकेश जोशी तेथे पोहचले. त्यांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू करून गोरक्षकांना धीर दिला.
या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी टेम्पो जप्त केला तर टेम्पोतील दोन्ही जनावरे भोईरवाडी येथील गोशाळेत पोहच केली आहेत. पुढील तपास
सुरु आहे.