Breaking News

देशाला महासत्ता बनवण्यासाठी मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करा -खासदार श्रीरंग बारणे

कळंबोली : रामप्रहर वृत्त
देशातील सर्व तरुणांना रोजगार आणि प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले पाहिजे याची पूर्ण जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. सर्वसामान्य नागरिकांसह महिलांना सन्मान देण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. त्यामुळे आपल्या देशाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी आणि जागतिक पातळीवर महासत्ता बनवण्यासाठी मोदीजींना पुन्हा पंतप्रधान, तर मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्ट्रिक करून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला द्या, असे आवाहन महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी कळंबोलीत केले. ते जाहीर सभेत बोलत होते.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, मनसे आणि मित्रपक्ष महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या वतीने कळंबोली सेक्टर 11मधील एमएसईबी मैदानात जाहीर सभेचे आयोजन बुधवारी (दि. 8) करण्यात आले होते. या सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित झाला असल्याचा विश्वास व्यक्त केला तसेच येत्या 13 तारखेला आपला मतदानाचा हक्क बजावून खासदार श्रीरंग बारणे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन केले.
या सभेला भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, पनवेल महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, मोनिका महानवर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, अशोक मोटे, बबन बारगजे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, तालुकाप्रमुख रूपेश ठोंबरे, मनसेचे राहुल चव्हाण, विवेक बोराडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस भिमसेन माळी, सचिन कुंभार, भाजप महिला मोर्चाच्या प्रिया मुकादम, कुंदा गोळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply