Breaking News

पनवेलमध्ये राजे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : वार्ताहर

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची देवाण घेवाण करीत महाराजांचे आचार विचार लहानांपासून थोरांपर्यंत पोहोचविण्यासाठी उभी राहिलेली चळवळ म्हणजे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुरू केलेली राजे प्रतिष्ठान संस्था. या संस्थेच्या पनवेल येथील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा येत्या 2 जून रोजी मोठ्या उत्साहात होणार आहे. या वेळी रॅलीमध्ये खा. उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राजे प्रतिष्ठानचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

या वेळी पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला राजे प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना मनाचा मुजरा करण्यात येणार आहे, तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करून प्रभातफेरी पनवेल बस स्थानकाच्या मार्गाने ठाणा नाका, गार्डन हॉटेल येथून राजे प्रतिष्ठानच्या कार्यालयाजवळ जाऊन उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या वेळी राजे प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष नितीन शिंदे, जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, सुनील काटकर ऊर्फ तात्या, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नारायण कोळी, उपाध्यक्ष राजूदादा बबन मरे, महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण (अचूभाई), मुंबई संघटक प्रमुख चंद्रकांत धडके उर्फ मामा, मुंबई शहर अध्यक्ष प्रकाश कोळी, मुंबई ईशान्य जिल्हाध्यक्ष अनिल उम्रटकर, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष अब्दुल शेख, मुंबई सचिव संजय गुप्ता, मुंबई सचिव अमोल डांगे, गिरीश दादा राणे, सल्लागार कृष्णा कोळी, अणुशक्ती विधानसभा अध्यक्ष विशाल निघडे, धारावी विधानसभा अध्यक्ष सचिन लोखंडे, पावणे अध्यक्ष अजय साळुंखे, नेरूळ अध्यक्ष अक्षय काळे, बदलापूर अध्यक्ष भूषण गजरे, ठाणे जिल्हाध्यक्ष नवनाथ बाबा अहिरे, वांगणी अध्यक्ष महारूफ सय्यद, ठाणे जिल्हा सचिव सुभाष गजरे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी रायगड जिल्ह्यातील नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात येऊन यासाठी पदग्रहण सोहळा पार पडणार आहे. या वेळी रायगड जिल्ह्यातील तालुकानिहाय पदाधिकार्‍यांची नेमणूक जाहीर करण्यात येणार आहे, तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात येणार आहेत. या वेळी अंदाजे दीड ते दोन हजार कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर पनवेलमधील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहनही या वेळी आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply