Breaking News

आपटा येथे शनिवारी मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबिर

आमदार महेश बालदी यांचा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष उरण विधानसभा तसेच एमजीएम हॉस्पिटल कामोठे-कळंबोली व आपटा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 15) सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आपटा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
आपटा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे होणार्‍या या शिबिरास भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकार्‍यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या शिबिरात रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळणार असून आरोग्य तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया त्याचबरोबर डोळ्यांची तपासणी व चष्मे वाटप, कृत्रिम हात व पाय बसविण्याच्या शिबिराचाही यामध्ये सहभाग आहे.
या शिबिरात सामान्य तपासणी, शल्यचिकित्सा, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, त्वचारोग, कान, नाक, घसा, नेत्ररोग, दंतचिकित्सा, औषधे, फिजिओथेरपिस्ट, रक्त तपासणी, इसीजी आदी सेवा उपलब्ध असणार आहेत. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी 7507225539, 9167695209 किंवा 7498981368 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply