आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त
दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमधील जनतेसाठी आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले असून या संदर्भात शनिवारी (दि. 13) खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक आयोजित करण्यात होती. या वेळी शिबिरासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पक्ष पनवेल आणि रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी म्हणून पनवेल तालुका व शहरातील गरीब व गरजू जनतेसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी व मोफत औषोधोपचार महाशिबिराचे आयोजन 4 ऑगस्ट रोजी सीकेटी महाविद्यालयात करण्यात आले आहे. या संदर्भात ही नियोजन बैठक झाली.
या बैठकीस भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी महापौर डॉ.कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीताताई पाटील, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, अॅड. मनोज भुजबळ, बबन मुकादम, मनोहर म्हात्रे, डॉ. अरुणकुमार भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी पं.स. सदस्य रत्नप्रभा घरत, भूपेंद्र पाटील, राज पाटील, भाजप तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तथा शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.पाटील, डॉ. संतोष आगलावे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन केले तसेच उपस्थितांमध्ये शिबिराविषयी चर्चा झाली.