आमदार महेश बालदी यांचा पुढाकार; महिलांचे अर्ज भरले
मोहोपाडा ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने मोहोपाडा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 14) करण्यात आला. या वेळी या योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले.
मोहोपाडा एचओसी कॉलनीमधील साईबाबा मंदिरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, जिल्हा उपाध्यक्ष रामदास ठोंबरे, राष्ट्रवादीचे नेते संदीप मुंडे, माजी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायतीच्या सरपंच उमा मुंडे, चौक सरपंच रितू ठोंबरे, सावळे सरपंच सुनील माळी, भाजप गुळसुंदे विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, केळवणे विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, वासांबे विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल, युवा मोर्चा अध्यक्ष प्रणित सांगळे, पनवेल तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, पोयंजे विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकूर, खालापूर तालुका सरचिटणीस प्रवीण जांभळे, कराडे खुर्द माजी सरपंच विजय मुरकुटे, वासांबे (मोहोपाडा) माजी सरपंच ताई पवार, विद्यमान सदस्य आकाश जुईकर, भूषण पारंगे, लोधीवली ग्रामपंचायत सदस्य निखिल पाटील, युवा नेते स्वप्नील राऊत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला उपस्थित होत्या. या वेळी इतरही योजनांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.