Breaking News

नेरे गावात विकासाची गंगा

38 लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
सबका साथ सबका विकास हे ब्रीद सार्थ ठरवत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शहरांसोबतच गावांचाही विकास होत आहे. याच पार्श्वभूमीवर नेरे गावातील 38 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 9) झाले. पनवेल विधानसभा मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली वेगाने विकासाची कामे होत आहेत. त्याअंतर्गत नेरे येथे आठ लाख रुपयांच्या निधीमधून ग्रामस्थ उदय ठाकूर यांच्या घरापासून ते दवाखान्यापर्यंतचा रस्ता, 10 लाख रुपयांच्या निधीतून ग्रामस्थ ज्ञानेश्वर भगत यांच्या घरापासून रस्ता, 10 लाख रुपयांच्या निधीमधून बैठक हॉलपर्यंत जाणारा रस्ता आणि 10 लाख रुपयांच्या निधीमधून संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. या विकास कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भुपेंद्र पाटील, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य राज पाटील, डॉ. रोशन पाटील, सरपंच प्रकाश गाडगे, उपसरपंच वंदना रोडपालकर, सदस्य निलीमा पाटील, कल्पना वाघे, माजी सरपंच वासुदेव गवते, सर्वना मगर, कविता गवते, मंगल बांगडे, सावित्री पाटील, राम पाटील, दिनेश मानकामे, शैलेश जाधव, माजी उपसरपंच नीलिमा पाटील, कल्पना वाघे, युवा मोर्चा अध्यक्ष सागर पाटील, सुभाष पाटील, मेघनाथ पाटील, बूथ अध्यक्ष सुनील पाटील, अमित गवते, किरण मानकामे, रामदास पाटील, गोपाल रोडपालकर, मिलिंद पाटील, विक्रांत मस्कर, रोहन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply