Breaking News

पळस्पे येथे राज्य सुरक्षा सप्ताह

तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

31 राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह विविध सुरक्षासंबधित कार्यक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत पळस्पे महामार्ग पोलीस केंद्रातर्फे 31 राज्य सुरक्षा सप्ताह 11 ते 17 जानेवारी दरम्यान यशस्वी राबवण्यात येणार आहे. या सप्ताहाचे रस्ता भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 11) उद्घाटन करण्यात आले. 31 राज्य सुरक्षा सप्ताहानिमित्त 11 ते 17 जानेवारी या कालावधीत विविध सुरक्षा संबंधित कार्यक्रम राबवून हा सप्ताह यशस्वी करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेतर्फे 31 राज्य सुरक्षा सप्ताह राबविण्यात येणार असून याचे उद्घाटन तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्यसाधून, महामार्गावर होणार्‍या अपघातांमध्ये तातडीने मदत कार्य पुरवणार्‍या मान्यवरांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला पोलीस अधिक्षक दिगंबर प्रधान, पोलीस उपअधिक्षक विजयसिंह पवार, तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपुत, खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर, सुभाष पुजारी, डि. ए. काकडे, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, प्रविण खंडागळे आदी उपस्थित होते.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply