पनवेल : रामप्रहर वृत्त
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महिलांच्या भावना जाणून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्य प्रणालीद्वारे थेट संवाद साधणार असून या संदर्भात उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. 18) सायंकाळी 5 वाजता पनवेल शहरातील विरूपाक्ष मंगल कार्यालयात ’लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, दीपक बेहेरे, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्यासह महिला मोर्चाच्या इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने घोषित केलेल्या लाडकी बहीण योजनेचे पहिले दोन हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. त्या अनुषंगाने या योजनेबद्दल माता-भगिनींच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. भाजप महिला मोर्चाने या उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्यासाठी पुढाकार घेत लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास लाडक्या बहिणींनी उपस्थित रहावे, असे आवाहन महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …