पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार, वार्ताहर
पनवेल तालुक्यातील मौजे पाली देवद (सुकापूर) येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनबाधित रुग्ण रहात असलेले मौजे पालीदेवद (सुकापूर) परिसर करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीघोषित केला आहे.
पनवेल तालुक्यातील मौजे पाली देवद (सुकापूर) येथील 107, ए विंग, निम्बेश्वरकुंज सोसायटी, पालीदेवद (सुकापूर) व त्यापासूनचा पूर्वे देवद गावाची हद्द, पश्चिमेस अय्यपा मंदिर, दक्षिणेस किडस गार्डन शाळा व उत्तरेस नवजीवन सोसायटी हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे क्षेत्र कन्टेटमेंट झोन (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणार्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.