पनवेल ः रामप्रहर वृत्त
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन तालुक्यातील चिंचवाडी येथील शेकापच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 26) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी स्वागत केले.
भाजपच्या पनवेल शहर आणि तालुका मध्यावर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे उपाध्यक्ष संजय पाटील, सुनील पाटील, मालडुंगे ग्रामपंचायतीचे सरपंच सीताराम चौधरी, उपसरपंच जनार्दन निरगुडा, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, आत्माराम भस्मा, रमेश पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासकामांमुळे ग्रामस्थांना अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यानुसार चिंचवाडी गावातील अनेक कामे मार्गी लागल्या आहेत. या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन शेकापचे गुलाब चाहू उघडे, गजानन कांबडी, विष्णू कांबडी, अनंता कांबडी, कान्हू कांबडी, दामू उघडे, चंद्रकांत उघडे, हरिदास ठाकरे, गुरूनाथ कांबडी, विष्णू कांबडी, यशवंत कांबडी, गुनी ठाकरे, महादी कांबडी, प्रमिला उघडे, संगीता उघडे, राकेश उघडे, पप्पी उघडे, गुलाब दामू उघडे, ताई कांबडी यांनी या वेळी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. जो विश्वास ठेवून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला तो विश्वास सार्थ ठरवू अशी ग्वाही, आमदार प्रशांत ठाकूर व भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी प्रवेशकर्त्यांना दिली.
Check Also
आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे
तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …