Breaking News

‘रोटरी’तर्फे पनवेलमध्ये कापसे पैठणीचे प्रदर्शन व विक्री

वर्षा ठाकूर, शुभांगी घरत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
थेट विणकर ते ग्राहक विक्री अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे महिलावर्गासाठी पनवेलमध्ये प्रथमच खास येवला येथील कापसे पैठणीचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 27) वर्षा प्रशांत ठाकूर आणि शुभांगी महेंद्र घरत यांच्या हस्ते झाले.
या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, वीर वूमन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष अर्चना ठाकूर, रोटरी क्लबचे मार्गदर्शक डॉ. गिरीश गुणे, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष शैलेश पोटे, सचिव दिपा गडगे यांच्यासह पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
29 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत गणपती मंदिर हॉल मिडलक्लास हौसिंग सोसायटी मैदानाजवळ या भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी 500 रुपयांपासून ते 50 हजारांपर्यंत पैठणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तसेच येवला प्युअर पैठणी, ब्रोकेड पैठणी, सेमी पैठणी, कांजीवरम सिल्क, चंदेरी, प्युअर सिल्क, इरकली, माहेश्वरी, पैठणी ड्रेस मटेरियल, पैठणी दुपट्टा, पर्स, उपाडा व इतर अनेक साड्या आहेत.
या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा तसेच या संदर्भात अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी 9322111115, 9820044742 किंवा 9820956554 येथे संपर्क साधावा, असे आवाहन शैलेश पोटे यांनी केले आहे.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply