कर्जत : बातमीदार
नेरळ शहर भाजपच्या सहकार्याने आणि धामोते येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवारी (दि. 13) नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 338 रुग्णांची नेत्र चिकित्सा करण्यात आली, त्यापैकी 45 रुग्णांना मोतीबिंदू दोष आढळल्याने त्यांच्यावर पनवेल येथे शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शिबिरात 109 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
धामोते गावात शिवजयंती उत्सव समितीने आपल्या 27 व्या वर्षात समितीच्या माध्यमातून मोफत नेत्र चिकित्सा आणि मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन केले होते. गावातील ग्रामदेवता मंदिरामध्ये पनवेल येथील श्री लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आणि नेरळ शहर भाजप यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या शिबिराचे उदघाटन कर्जत पं.स. चे माजी सभापती अमर मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी नेत्र चिकित्सेची 75 शिबिरे आयोजित करणारे भाजप प्रज्ञा प्रकोष्टचे कोकण संयोजक नितीन कांदळगावकर, शिवसेनेचे तालुका संघटक राजेश जाधव, नेरळ भाजपचे शहर अध्यक्ष अनिल जैन, शिवसेनेचे उपशहर प्रमुख बंडू क्षीरसागर, तंटा मुक्त समितीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बोंबे, ग्रामपंचायत सदस्या वंदना पेरणे, नेरळ भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस नम्रता कांदळगावकर आदी उपस्थित होते. समितीचे दत्तात्रय विरले, महेश विरले, ग्रामदेवता मंदिर समितीचे महादेव विरले, भाऊ पेरणे, नारायण शिंगटे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या शिबिरात लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. ध्रुवेन शाह यांच्या नेतृत्वाखाली वर्षा पाटील, आकाश प्रमाणी, निकिता म्हापूसकर, प्रणव सांडव, अरविंद कुमार यांनी रुग्णांची तपासणी करून घेतली, तर शिबिराचे व्यवस्थापन प्रकाश पाटील यांनी केले.शिबिरात 338 रुग्णांची नेत्र चिकित्सा करण्यात आली, त्यातील 108 रुग्णांना महेश विरले यांच्या माध्यमातून शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमात चष्मे दिले जाणार आहेत. तर 45 रुग्णांना मोतीबिंदूचे दोष आढळले असून, त्यांच्यावर पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयात अल्पदरात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीचे विजय पराडकर, उदय पाटील, जगदीश पेरणे, मुकेश पेरणे, सोमनाथ विरले, विश्वनाथ विरले, दिनेश विरले, भरत पेरणे, रोशन म्हसकर, पपेश विरले, चेतन विरले यांनी सहकार्य केले.