पनवेल ः रामप्रहर वृत्त
सिडकोने पनवेल महापालिका हद्दीतील उद्याने आणि खेळाची मैदाने हस्तांतरित केली आहेत. ही उद्याने आणि खेळाची मैदाने महापालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी (दि. 3) खारघरमधील उद्याने आणि खेळाच्या मैदानांची पाहणी करून अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
सिडकोच्या वतीने महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेली उद्याने आणि खेळाची मैदाने महापालिका विकसित करून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार खारघर सेक्टर 35 ई, से. 21मधील उद्याने आणि खेळाच्या मैदानांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकारी आणि नगरसेवकांसह पाहणी केली. या पाहणी दौर्यात स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ‘अ’ सभापती अनिता पाटील, नगरसेवक प्रवीण पाटील, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, वासुदेव पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, खारघर अध्यक्ष विनोद घरत, साजिद पटेल, नरेश पटेल आदींचा समावेश होता. या वेळी परेश ठाकूर यांनी अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …