खारघर : रामप्रहर वृत्त
भाजप (खारघर) महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले आणि मावळचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांचा नागरी सत्कार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 19) खारघरमध्ये करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, रि.पा.ई. (आ) रायगड जि. अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, शिवसेना पनवेल जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे, राष्ट्रवादीचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, रिपाई पनवेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांची विशेष उपस्थिती लाभली. यासोबतच भाजप जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, किर्ती नवघरे, खारघर सरचिटणीस नरेश ठाकूर, अमर उपाध्याय, आरती नवघरे, समीर कदम, किरण पाटील, अक्षय लोखंडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निमंत्रक भाजप महिला मोर्चा खारघर अध्यक्ष साधना पवार, शिवसेना महिला आघाडी प्रमुख चंचला बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्ष उषा आहेर, भाजप युवा मोर्चाचे नितेश पाटील, युवासेना खारघर प्रमुख ओंकार वेदांते, रि.पा.ई. युवक आघाडी सरचिटणीस डॉ. विजय मोरे, संतोष सोनकांबळे, राष्ट्रवादीचे तळोजा ग्रामीण अध्यक्ष अनिल पाटील हे होते.
खारघरमध्ये झालेल्या कार्यक्रमाचे आयोजन भाजप खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, शिवसेना खारघर शहर प्रमुख प्रसाद परब, रि.ब.वि.प.चे सरचिटणीस सुशील महाडिक, राष्ट्रवादीचे खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके यांनी केले होते.
Check Also
टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …