Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल मतदारसंघाचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जलद गतीने विकास होत आहे. या अंतर्गत ग्रामीण भागात पाच कोटी 30 लाख रुपयांच्या निधीमधून विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 3) झाले.
या वेळी अरुणशेठ भगत यांनी आगामी काळातही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अशाच प्रकारच्या विकासकामांचा झंझावात सुरू राहणार असल्याची ग्वाही दिली.
या विकासकामांमध्ये 50 लाख रुपयांच्या निधीमधून कोळवाडी गावात अंतर्गत गटार आणि रस्त्याचे काँक्रीटीकरण, दोन कोटी रुपयांच्या निधीमधून शेडुंग, नेरे, बेलवली रस्ता काँक्रीटीकरण, 20 लाखांच्या निधीतून नेवाळी येथे जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत बांधण्याचे आणि रस्ता काँक्रीटीकरणाचे काम, एक कोटी 30 लाख रुपयांच्या निधीतून वावंजे, निताळे मानपाडा कातकरीवाडीकडे जाणार्‍या रस्त्याचे काँक्रीटीकरण, 20 लाखांच्या निधीतून खेरणे शिवमंदिर रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि एक कोटी 10 लाख रुपयांच्या निधीतून खैरवाडी ठाकूरवाडी गावाकडे जाणार्‍या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या सर्व विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमांना भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, कोळवाडी येथे नाथाशेठ आगलावे, जनार्दन आगलावे, दगडू आगलावे, सोपान आगलावे, सुरेश आगलावे, भास्कर आगलावे, श्रीपत आगलावे, बळीराम नाईक, भगवान दरे, प्रकाश आगलावे, डॉ. संतोष आगलावे, योगेश आगलावे, रोहिदास आगलावे, गजानन भोईर, निलम भोईर, मृणालिनी आगलावे, कृष्णशेठ पाटील, पवन भोईर, मारुती चिखलेकर, लक्ष्मण उलवेकर, अविनाश उलवेकर, दीपक उलवेकर, परेश पाटील, राजेश पाटील, नवनाथ खुटारकर, अंकुश पाटील; वावंजे येथे विभागीय अध्यक्ष प्रकाश खैरे, अल्पसंख्याक सेल चिटणीस नासिर शेख, युवा मोर्चा तालुका चिटणीस सचिन पाटील, वावंजे पं.स. विभागीय अध्यक्ष निलेश दाढावकर, बूथ 14चे अध्यक्ष उल्हास पाटील, बूथ 16चे अध्यक्ष हरेश पाटील, बूथ 17चे अध्यक्ष जगन डोंगरे, वासुदेव चोरमेकर, दशरथ पाटील, महादेव चोरमेकर, किशोर पाटील, सुभाष पाटील, गुलशन पाटील, बळीराम गोंधळी, कृष्णा गोंधळी, अरुण थळे, अरुण चोरमेकर, मनोज वळपकर, प्रथमेश म्हात्रे, मयूर खैरे, पांडुरग दाढावकर, शनिवार दाढावकर, विष्णूबुवा दाढावकर, कचरू कातकरी, रवी कातकरी, हरिदास कातकरी, चंद्रकांत पाटील, नितीन पाटील, प्रवीण शेडगे, हरिश्चंद्र सांगडे; खेरणे येथे सरपंच शैलेश माळी, उपसरपंच राजेंद्र गोंधळी, अशोक गोंधळी, प्रदीप माळी, प्रवीण गोंधळी, वासुदेव फडके, ज्ञानेश्वर गोंधळी, धोंडराम पाटील, शनिवार पाटील, मधुकर गोंधळी, महेश गोंधळी, दिनेश गोंधळी, गुरूनाथ गोंधळी, महिंद्रा गोंधळी, भास्कर गोंधळी, संतोष गोंधळी; बेलवली येथे वारदोलीचे सरपंच राम भवर, प्रभारी सरपंच हेमंत तांडेल, उपसरपंच अनंता पवार, माजी सरपंच बाळू भुतांबरा, बबन पवार, माजी उपसरपंच सतिश पाटील, जितेंद्र बताले, सदस्य दिनेश पाटील, संजय गायकर, अरुण पवार, गोपाळ पाटील, रामदास ढोपरे, बुधाजी पवार, पांडुरंग पारधी, विष्णू पवार, सोपान चोरघे, नारायण म्हात्रे, योगेश पाटील, तेजस पाटील, निलेश पवार, देवेश पवार, उमेश पाटील, रवींद्र शेळके, रवींद्र गडकरी, नितीन भगत, आनंद ढवळे, योगेश लहाने, भालचंद्र पाटील, मुकेश भगत, अप्पा भागीत, अनिल पाटील, लक्ष्मण मेढेकर, रवी शेळके; खैरवाडी येथे भाग्यश्री कोळंबेकर, हनुमान खैर, लक्ष्मण शीद, मंगळ्या वारगडा, पद्या थोराड, आंबो थोरड, काळुराम थोराड, गजानन कोळंबेकर; नेवाळी ग्रामपंचायत सदस्य राजेश काथारा, आकाश काथारा, प्रमोद खांदेकर, आकाश लहू काथारा, दीपक काथारा आदी उपस्थित होते.

Check Also

डिस्टन्स इलेव्हनने पटकावले नमो चषक व्हॉलीबॉल विजेतेपद

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक …

Leave a Reply