पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघात येणार्या कसळखंड ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यासह शेकाप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 4) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे आमदार महेश बालदी आणि भाजपचे नवी मुंबई माजी जिल्हाध्यक्ष तथा उरण निरीक्षक रामचंद्र घरत यांनी स्वागत केले.
उरण द्रोणागिरी येथे झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते नंदकुमार पटवर्धन, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष प्रवीण खंडागळे, उरण शहराध्यक्ष कौशिक शाह, गुळसुंदे जि.प. विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, पोयंजे पं.स. विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकूर, तानाजी खंडागळे, भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी पाटील, कसळखंड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनंता पाटील, माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, माजी उपसरपंच महेंद्र गोजे, महादेव पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुरेश नाईक, बुथ अध्यक्ष मेघश्याम पाटील, सचिन पाटील, नरहरी घरत, शांताराम घरत, हरेश पाटील, योगेश जुनघरे, दत्ता गायकर, सचिन पाटील, प्रफुल्ल मते, सुमित गोजे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर आकर्षित होऊन कसळखंड ग्रामपंचायतीचे शेकाप सरपंच संजय घरत, सदस्य उबाठाचे गिरीष पाटील यांच्यासह शिवाजीनगर फणसवाडीतील शेकापचे सुनील पाटील, बाळाराम वाघमारे, विष्णू वाघमारे, रवींद्र वाघमारे, रोषन वाघमारे, गणेश वाघमारे, देवीदास वाघमारे, रामदास वाघमारे, पंढरी वाघमारे, सुरेश डुकरे, महादेव डुकरे, राहुल वाघमारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत करण्यात आले.
Check Also
Как использовать аналитические функции на 1xbet зеркало
Как использовать аналитические функции на 1xbet зеркало Аналитические функции на платформе 1xbet зеркало предоставляют пользователям …
RamPrahar – The Panvel Daily Paper