Breaking News

आयपीएलमध्ये आर्चरच्या रिक्त जागी तिघे शर्यतीत

मुंबई : प्रतिनिधी

इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020 च्या मोसमाला सुरुवात होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला. राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर याने कोपर्‍याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. जोफ्राच्या तंदुरुस्तीबाबत संघमालक इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी बोलणार आहेत, पण तोपर्यंत दुसरीकडे जोफ्राच्या जागी कोणाला अंतिम अकरामध्ये खेळवायचे, याची चाचपणीही त्यांनी सुरू केली आहे. आर्चरच्या जागी तीन खेळाडू शर्यतीत आहेत.

24 वर्षीय जोफ्रा आर्चरसाठी राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलच्या 2018च्या मोसमात जोफ्रासाठी 7.2 कोटी रुपये मोजले. आर्चरने आपल्या कामगिरीच्या जोरावर दोन मोसमांत 26 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याचे नसणे राजस्थान रॉयल्ससाठी मोठा धक्काच मानला जात आहे. राजस्थान रॉयल्स संघाने अजूनही आशा सोडलेल्या नाही, मात्र तो खेळू शकला नाही, तर त्याला पर्याय म्हणून तीन नावे समोर आली आहेत. यात ऑस्ट्रेलियाचे डॅनिएल सॅम्स व अ‍ॅडम झम्पा आणि वेस्ट इंडिजचा कार्लोस ब्रेथवेट यांचा समावेश आहे.

डॅनिएल सॅम्सने बिग बॅश लीगच्या 2019-2020च्या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याने 17 सामन्यांत 30 फलंदाजांना माघारी पाठवले आहे. तो चांगली फलंदाजीही करतो.

आयपीएलच्या एका डावात सहा विकेट्स घेणार्‍या तीन गोलंदाजांपैकी एक असलेल्या अ‍ॅडम झम्पाला 2018च्या आयपीएल लिलावापासून आतापर्यंत एकही फ्रँचायझीने आपल्या ताफ्यात घेतलेले नाही. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे मालिकेत झम्पाने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना दोन वेळा बाद केले. त्यामुळे झम्पाला राजस्थान रॉयल्स घेऊ शकतात.

कार्लोस ब्रेथवेटलाही त्याची प्रतिभा सिद्ध करण्याची पुरेशी संधी मिळालेली नाही. आयपीएल 2020 लिलावात त्याच्यावर बोली लावण्यास कोणीच उत्सुक दिसले नाही.  बेन स्टोक्ससारखाच तोही परफेक्ट ऑलराऊंडर आहे. त्याला घेण्यासाठी आता राजस्थान रॉयल्सला केवळ 50 लाख मोजावे लागतील. राजस्थान रॉयल्स संघ : अंकित राजपूत, बेन स्टोक्स, जोस बटलर, महिपाल लोम्रो, मनन वोहरा, मयांक मार्कंडे, राहुल टेवाटीया, रियान पराग, संजू सॅमसन, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, स्टीव्हन स्मिथ, वरुण अ‍ॅरोन, रॉबीन उथप्पा, जयदेव उनाडकट, यशस्वी जैस्वाल, कार्तिक त्यागी, अनुज रावत, आकाश सिंग, डेव्हीड मिलर, ओशाने थॉमस, अनिरुद्ध अशोक जोशी, टॉम कुरण, अ‍ॅण्ड्रे टे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply