पेण : प्रतिनिधी
येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयातील डीएलएलई युनिट, एनएसएस युनिट व पेण तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑनलाइन गुगल मीट वर राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. एस. बी. धारप यांनी प्रास्ताविकात निवडणूक आयोगाच्या स्थापनेची माहिती दिली. महाविद्यालयातील डीएलएलई युनिट आणि एनएसएस युनिट तर्फे महाविद्यालयात निबंध स्पर्धा, चित्रकला, घोषवाक्य व गायन स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी मतदारासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. राधा राजेश विश्वकर्मा (टिवायबीए) हिने प्रतिज्ञा म्हणून दाखविली. प्रमुख व्याख्याते नायब तहसीलदार सुनिल जाधव यांनी ऑनलाइन उपस्थित राहून मतदानाचे महत्व या विषयी सविस्तर माहिती दिली. पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मंगेश नेने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. देविदास बामणे यांनी केले. डॉ. मधुकर साळुंखे, डॉ. टी. डी. माळवे, डॉ. ए. एम. पाटील यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या वेळी उपस्थित होते. डॉ. एस. डी. लकडे यांनी आभार मानले.