पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात मंगळवारी (दि. 3) महिला मोर्चाची आढावा बैठक झाली. या वेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंत्तीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या बैठकीस पनवेलच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, महिला मोर्चाच्या पनवेल तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, दक्षिण रायगड सरचिटणीस डॉ. मंजुषा कुद्रीमोती, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रज्ञा धवन, रश्मी लुडबे, शिल्पा मराठे, अरुणा पाटकर, अंजली साळवी, आरती तायडे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, पनवेल शहराध्यक्ष वर्षा नाईक, भटके विमुक्त आघाडीच्या अध्यक्षा विद्या तामखडे, राखी पिंपळे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या. महिला मोर्चाच्या वतीने पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तसेच पक्षामार्फत होणारी विकासकामे घराघरापर्यंत पोहचवण्यासाठी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत धन्यवाद मोदीजी कार्ड, एसईओचे फॉर्म भरणे, सोशल मीडियाच्या माध्यामातून अधिकाधिक प्रभावीपणे काम करण्याच्या दृष्टिकोनातून ट्विटर आणि फेसबुकवर अकाउंट बनवणे तसेच व्हॉट्सअॅप गु्रप तयार करून संघटना मजबूत करण्याचे उपक्रम महिला मोर्चाच्या पदाधिकार्यांमार्फत राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत ही आढावा झाली. या वेळी जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी उपस्थित महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले तसेच कामाचा आढावा घेतला. दरम्यान, पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने त्यांना महिला मोर्चाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
RamPrahar – The Panvel Daily Paper