Breaking News

आदिवासी आणि चर्मकार समाजाचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त
समस्त आदिवासी समाज आणि चर्मकार समाज बांधवांच्या भव्य मेळाव्यात त्यांनी पनवेलच्या विकसाचे सुत्रधार आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला जाहीर पाठींबा रविवारी दिला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी समाजबांधवांच्या पाठीशी मी सदैव उभा राहणार असून संत रोहीदास मंदिर आणि आदिवासी भगिनींना कायमस्वरूप व्यवसाय करण्याची व्यवस्था करण्याची कामे येत्या काळात पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली.
पनवेल विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना विविध संघटना, संस्था तसेच समजा बांधवाचा पाठिंबा मिळत आहे. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा देण्यासाठी खारघर सेक्टर 19 मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये समस्त आदिवासी समाज आणि चर्मकार समाज बांधवांचा भव्य मेळावा रविवारी संपन्न झाला. संघटनेचे अध्यक्ष जगदीश ठकूर यांच्या पुढाकाराने हा मेळावा झाला. या मेळाव्यात समाज बांधवानी आपला जाहीर पाठिंबा आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहिर केला.
या वेळी दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहे पडवळ, शिवसनेचे पनवेल जिल्हा अध्यक्ष रामदास शेवाळे, पनवेल गटई कामगार युनियनचे अध्यक्ष शिवदास कांळे, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रविण पाटील, शिवसेना खारघर शहर प्रमुख प्रसाद पर, आरपीआयचे तालुका अध्यक्ष विजय पवार, संत शिरोमणी सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश काकडे, अध्यक्ष जगदिश ठाकूर, खारघर वेलफेर्अ असोसिएशनचे प्रेम ठाकूर, उपाध्य सुरेश उनवणे, सचिव राजेंद्रमुकार कारंडे, खजिनदार सखाराम ठोसर, धामोळे गाव कमिटी अध्यक्ष बाळाराम पारधी, खारघर भाजी मार्केट समन्वयक विद्या भगत, गौर्‍या गणपती ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद पावशे, संत शिरोमणी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भानुदास राजगुरु, शहर गटई कामगार युनियनचे अध्यक्ष राजेश परमेश्वर, समाजीक कार्यकर्ते केशव कातकारी, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष मंगेश नेरुलकर, पनवेल शहर गटई कामगार युनियनचे तालुका अध्यक्ष राजकुमार डोयरीया, पांडुरंग वैष्णव आदी
उपस्थित होते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply