पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन एशियन हार्ट इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने जनरल प्रॅक्टिस करणार्या डॉक्टरांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गांधी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रमोद गांधी हे उपस्थित होते. शिबिरामध्ये डॉ. श्रवण शेट्टी यांनी मान डोके यामध्ये होणार्या कर्करोगाचे प्रकार, निदान आपल्या प्रॅक्टिसमध्ये कसे करावे याबद्दलचे मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकारे केले. स्त्रियांमध्ये होणार्या कर्करोगाबद्दल, तसेच ते होऊ नये त्यासाठी काय काळजी घ्यायची व त्याची उपययोजना कशी करायची याबद्दल माहिती डॉ. प्रिया ईस्पूनियान यांनी दिली. संघटनेचे अध्यक्ष डॉ. वैभव मोकल यांनी संघटनेबदल थोडक्यात माहिती सांगितली. या शिबिराला मोठ्या संख्येने प्रॅक्टिशनर डॉक्टर उपस्थित होते.