खोपोली ः प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे खालापूर तालुका अध्यक्ष मोरेश्वर उर्फ बापू घारे यांचे शुक्रवारी (दि. 4)पहाटे डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते 50 वर्षांचे होते.
खालापूर तालुक्यातील गोहे गावचे सुपुत्र असलेले बापू घारे यांनी वावोशी व परिसर कार्यक्षेत्र निवडले. अत्यंत शांत व संयमी तसेच आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेले बापू घारे यांच्या निधनाचे वृत्त सर्वपक्षीय नेत्यांना धक्का देणारे होते. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते अखेर शुक्रवारी पहाटे त्यांची मृत्यूशी झूंज संपली.
बापू घारे यांना सन 2017मध्ये भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी खालापूर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी दिली व त्यांनी ती समर्थपणे सांभाळली. त्यांच्या कामाचा धडाका पाहून आमदार ठाकूर यांनी त्यांची सन 2020च्या दरम्यान फेरनियुक्ती केली. घारे यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी आपुलकीचे नाते होते. त्यांच्या निधनाने सहकारी कार्यकर्त्यांना तर घरचाच माणूस गेल्याचे दुःख झाले. जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तसेच खोपोली व खालापूर भाजपतर्फे घारे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …