Breaking News

शेलू रेल्वे स्थानकात पादचारी पूल आणि निवारा शेडचे काम वेगाने सुरू

कर्जत : बातमीदार

मध्य रेल्वेच्या मुंबई-कर्जत मार्गावरील शेलू स्थानक विकसित करण्यात येत आहे. या स्थानकात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहेत. दरम्यान, नवीन पादचारी पूल आणि निवारा शेडची कामे अंतिम टप्प्यात आली असून, पावसाळ्यापूर्वी दोन्ही कामे पूर्ण केली जातील असे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेच्या कर्जत बाजूकडील शेलू स्थानकाचा परिसर गेल्या दोन वर्षांपासून विकसित होत आहे. नेरळ शहराजवळ असल्याने शेलू परिसरातील जमिनीवर विकासक मोठ्या प्रमाणात इमले बांधत आहेत, त्यांना चांगला प्रतिसाददेखील मध्यमवर्गीय देत आहेत.  शेलू स्थानकाच्या दोन्ही बाजूला होणारे नागरिकरण लक्षात घेऊन मध्य रेल्वेने या स्थानकात दुसरा पादचारी पूल उभारण्यास सुरुवात केली आहे. या स्थानकात पुर्वी मुंबईएन्डकडेच पादचारी पूल होता, मात्र आता कर्जतएन्डकडेदेखील पादचारी पुलाची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही फलाटांवर हा पादचारी पूल उतरत असून पावसाळ्यापूर्वी तो प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे.

शेलू रेल्वे स्थानकातील भविष्यातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दोन्ही फलाटांच्या छपरावर पत्रे टाकण्यात येत आहेत. पुर्वी फक्त दोन्ही फलाटांवर मिळून जेमतेम 100 मीटर भागात पत्रे होते. मात्र या भागात असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात येणार्‍या विद्यार्थ्यांनी सातत्याने शेलू स्थानकातील समस्या आणि सुविधांबाबत थेट मध्य रेल्वेकडे आपले म्हणणे मांडले होते. त्याची दखल घेवून शेलू रेल्वे स्थानकातील फलाटांवर पत्रे टाकण्यात येत आहेत. हे कामदेखील अंतिम टप्प्यात आहे. फलाटांच्या छपरावर पत्रे टाकण्यात येत असल्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात शेलू स्थानकात प्रवाशांना उघड्यावर उभे राहावे लागणार नाही.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply